Twitter handle सारखं सेल्फ इमेज
handle असते ज्याच्या सहाय्याने आपण आयुष्याच्या
गर्दीतून वाट काढतो. आणि तेच handle इतर लोकं
आपल्याला manipulate करायला वापरू
शकतात.
आपली सेल्फ इमेज आपण तयार करत असतो - ‘मी अस कधीच वागत नाही,’
‘मी नेहमीच टापटीप असतो,’ ‘मला अन्न
टाकलेलं चालत नाही,’ ‘संकटात असलेल्या माणसाला मदत केल्याशिवाय मी स्वस्थ बसू शकत
नाही’ अशा तऱ्हेने.
लोकांना आपल्यात जे गुण दिसतात त्याचं ते कौतुक करतात.
हळूहळू हे कौतुक मिळाव म्हणून आपण तसं वागत जातो आणि मग तो सवयीचा भाग बनतो. अशा
तऱ्हेने तीच आपली ओळख होऊन बसते. शेवटी आपण या सेल्फ इमेजची शिकार बनून जातो.
कित्येक वेळा सेल्फ इमेज प्रमाणे वागण सोयीचे नसले तरीही अट्टाहासाने तसच वागतो. आणि
काही अडथळे आलेच तर आपण स्वतःला त्रास करून घेउनही सेल्फ इमेज ला साजेसच वागतो.
एक साधं उदाहरण बघू. आमच्या नात्यातल्या एक बाई अत्यंत हलाखीत
लहानपण गेलेलं. काटकसरीत जीवन गेलेलं. मुल मोठी झाली. आता सुबत्ता आहे. ‘मी अन्न
वाया घालवत नाही.’ ही खोल रुजलेली value. आता वय ७५, गुडघेदुखी सुरु झालेली. तिसऱ्या मजल्यावर घर,
बिल्डींग मध्ये लिफ्ट नाही. ....... घरी मुलाने लसून शेव आणली, पण फारशी कुणाला
आवडली नाही त्यामुळे सहा महिने पडून राहिली, खराब वास यायला लागला, कोणी खाण शक्य
नव्ह्त. सर्वानुमते शेव आता टाकून देऊ अस ठरलं. बाई शेव घेऊन खाली निघाल्या. मुलगा
म्हणाला अग कुठे निघालीस, पाय दुखतोय ना? तर त्या म्हणाल्या, अरे शेव टाकून येते
कचरापेटीत. अग पण केरवाला येईल ना उद्या, केरात टाक ना .. साधा सरळ सल्ला. बाई
म्हणाल्या केरवाला बडबड करेल. तो नेहमी म्हणत असतो लोक किती वाया घालवतात, टाकून
देतात. नको मी आपली टाकून येते कचरापेटीत. सर्वांनी समजावून सांगूनही बाई खाली उतरून
कचरापेटीत शेव टाकून आल्या.
केरवाल्या माणसाच्या approval वर आपण जीवन जगतो का असा
विचार माझ्या मनात सारखा रेंगाळत राहिला. मग लक्षात आल कि खरतर नाही. आपल्या मनानी सोसायटी
च्या values internalize केल्या आहेत ते
मनच केरवाल्याचा हवाला देऊन आपल्याला आपल्या सेल्फ इमेज पेक्षा वेगळ वागून देत
नाही.
आपल्यालाही असे काही अनुभव share करायचेत का ?