२५ व्या ब्लॉगच्या निमित्ताने


या महिन्यात माझा २५ वा ब्लॉग प्रसिद्ध झाला. आत्तापर्यंत सुमारे १३००० नजरांनी त्याला भेटी दिल्या. वाचलाच असेल अस नाही. पण आकडा तसा फार लहान नाही. मला आणखी लिहायला प्रवृत्त करणारा नक्कीच आहे. या प्रवासात माझी लिखाणाची एक style घडत गेली. म्हणजे मी जस बोलते तसाच इंग्रजी मराठी कडबोळ करत बाळबोध पणे लिहित जाते. पण लिखाणाच्या या पद्धतीतील दोषाकडे दुर्लक्ष्य करत वाचणारे वाचतात हेही मला कळले आहे.
Half embrace हे नाव काही लोकांना खटकले. त्याचा genesis इथे सांगते. श्री दिलीप चित्रे यांचे Says Tuka  हे पुस्तक वाचनात आले. अभंगांचे इंग्रजी version आहे ते. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात तुझ्या चरणी - I will not accept anything less than full embrace. मला अध्यात्माची गोडी लागली आहे. पण अध्यात्म म्हटलं कि काही लोक पाल झटकल्सायारखे करतात. अध्यात्म हि मनोभूमिका आहे. ती रोजच्या जगण्यात आचरता येते असा माझा विश्वास आहे.
या ब्लॉग मधून अध्यात्माच्या अलीकडच्या पायरी पर्यंत धडपडत पोचण्याचा व ती सोप्या पद्धतीने वापरण्यासारख्या, पचण्यासाठी गुलगुलीत करून पेश करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्याकडे प्रश्नांची उत्तरे आहे असे नाही . पण मला जे कळले ते माझ्या या मुद्द्याकडे नेमकेपणानी न बघितलेल्या मंडळी पर्यंत पोहोचवावे असे मला वाटते. त्याचा हा माझा अर्धवट प्रयत्न Half embrace
मला आतापर्यंत अनेकांनी 'लिहित रहा' असा आशिर्वाद दिला आहे. तो शिरसावंद्य मानून लिहित रहाणार आहे. एक प्रयोग म्हणून आता ब्लॉग व्यावसायिक पातळीवर घेऊन जाणार आहे. आपल्या सर्वांच्या भरभरून दिलेल्या प्रतिसादासाठी धन्यवाद ... 

No comments:

Post a Comment