कित्येक वेळेला
आपल्याला
अलौकिक
अनुभव
येतात.
अलौकिक
म्हणजे
पारलौकिक
नव्हे
तर
देण्याघेण्या
पलीकडचे.
हिशोबी
जगापेक्षा
वेगळे.
मग
ते
प्रेम
असो, मैत्री असो, निरपेक्ष मदत
असो, मनापासून द्यावेसे
वाटणारे
योगदान
असो, एखादी भन्नाट
कल्पना
अथवा
जगावेगळ
काम
असो, किंवा एखाद्या
आवडत्या
कलाकृतीचा
आस्वाद
असो.
या
अनुभवांनी
आपल
आयुष्य
काही
काळापुरत
उजळून
जात.
कवीमन, कलाकाराची निर्मितीक्षमता, खेळाडूची एकाग्रता, ध्येयनिष्ठ व्यक्तीची
कार्यमग्नता, अध्यात्मिक साधनेतील
शांतता,
स्वयंपाक
करतानाची
एकतानता, लहान मुलाची
निरागसता
या
गोष्टी
अलौकिक
स्पर्श
व्यक्तीच्या
जगण्याला
करतात.
हा
अलौकिक
स्पर्श
मिळवण्यासाठी
तुम्हाला
दैवी
देणगी
असण्याची
गरज
असत
नाही.
पण
तो
मिळवण्याची
आस
व
त्यासाठी
लौकिक
विचारांची
लुडबुड
थांबवण्याची
गरज
असते
लौकिक म्हणजे व्यवहारी जग. एक हाथ से देनेका और एक हाथ से लेनेका. हिशोब, बरोबरी, स्पर्धा, दिखावा, यश, पैसा, मान अपमान, मनोरंजन, प्रसिद्धीची आवड, स्टेटस, याची झालर असलेल जग. अलौकीकाच्या आंतरिक शांतीपेक्षा भौतिक शक्तींची भुरळ कमालीची आकर्षक आहे. आपल्या भाषेतील म्हणी शक्यतो लौकिक जगाचे नियम सांगणाऱ्या असतात तर सुविचार हे अलौकिक जगाकडे अंगुलीनिर्देश करतात.
आपल्याला या
दोन्ही
जगांची
भुरळ
पडत
असते.
सोयीने
कधी
आपण
इकडे
झुकतो
तर
कधी
तिकडे.
दोन्ही
जगात
कष्ट
आहेत
आणि
आनंदही
आहे
पण
त्या
दोन्हीची
जातकुळीच
वेगळी
आहे.
आपण
सफरचंदाच्या
झाडाला
पाणी
घालून
संत्री
येतील
अशी
अपेक्षा
करणे
जसे
योग्य
नाही, तसे लौकिक
जगाचे
नियम
पाळून
अलौकिक
जगाची
बक्षिसे
मिळवणे
शक्य
होत
नाही.
आपल्या
आयुष्यात
घडणाऱ्या
communication
मधे
या
नियम
आणि
बक्षिसांची
इतकी
सरमिसळ
झालेली
असते
कि
आपण
सर्रास
दोन्ही
जगातील
गोष्टी
एकावेळेस
तोंडी
लावायला
घेतो.
विशेषतः
बोलतो
अलौकिक
गोष्टींबद्दल
पण
मनात
मात्र
मला
काय
मिळणार
यातून
हा
लौकिक
जगाचा
विचार
बाळगतच.
मानवी
आयुष्य
तसेही
खूप
complex असल्यामुळे, आपल्याला ती clarity
नसणेही खपून जाते.
त्याखेरीज लौकिक जगातून येणारे हाकारे आपल्याला भांबावून टाकतात आणि प्रक्टिकल विचार करायच्या नादात आपण समाधान घालवून बसतो. आपण हि वाक्य अनेकदा ऐकली असतील ना -
सध्या हा ट्रेंड आहे तू मागे राहू नकोस, सोबतचे सगळे पुढे जातील
आवडीच्या गोष्टी करत बसून पोट भारत नाही, या खुळचट कल्पना सोडून दे
हे स्थळ चांगले आहे, प्रेमानी पोट भारत नाही (बर्फी सिनेमात नायिकेची आई)
या नोकरीत मान सन्मान, पैसा आहे; आवडीचे काम हि एक मिथ आहे
आई वडिलांचे प्रेम ठीक आहे, पण तुझ्यापुढे तुझे संपूर्ण आयुष्य आहे
इतकं एखाद्यासाठी करून काय उपयोग
जगात भावनाप्रधान राहून चालत नाही व्यवहार पाहावा लागतो, तडजोडी कराव्या लागतात अस स्वतःला सांगत आपण पुढे पुढे जात राहतो. कर्तव्य पार पाडत राहतो खऱ्या जिव्हाळ्या शिवाय. मग अंतरी एक पोकळी जाणवत राहते. हि अस्वस्थता कुठून आली ते कळत नसते. ती अंतर्मनाची आर्तता असते. त्याला अलौकीकाची आस लागलेली असते.
आंतरिक अस्वस्थता घालवण्याचे व्यावहारिक मार्ग आपण शोधतो, पण ते वरवरचा मुलामा ठरतात. आपण स्वतःला कामात गुंतवतो, न आवडणाऱ्या लोकांच्या घोळक्यात कोंडून घेतो, काहीतरी करमणुकीची साधने शोधतो, प्रवासास जातो, नाहीतर व्यसनाच्या आहारी जातो, व आयुष्याच्या परीपुर्तातेच्या, समाधानाच्या, शांतीच्या मार्गापासून स्वतःला लांब ठेवतो. विपश्यना ज्यांनी भारतात आणली व जगभर रुजवली ते गोयंका गुरुजी म्हणायचे मी श्रीमंत घरात जन्मलो हे माझे भाग्याच, कारण पैसा फोल आहे हे मला लवकर कळले आणि मी योग्य मार्गाकडे जाऊ शकलो.
खरतर आपण सगळेच मुक्तीच्या मार्गावरील वारकरी आहोत, अलौकीकाकडे जाणारा मार्ग हो लौकिकाशी फारकत घेणारा असल्यामुळे अवघड वाटतो. खरतर तो सहजमार्ग आहे. पण लौकिकाशी जोडलेल्या आपल्या जहाजाच्या दोऱ्या एक एक करून सोडाव्या लागतील.
रोजच्या जगण्यासाठी लौकिकाचा उपयोग करून घेता येतो त्याच्या आहारी न जाता.
अध्यात्म हे जगण्याचे तत्वज्ञान आहे जागून झाल्यावर lip
service देण्याची गोष्ट नाही. आजच्या काळात आपण काही वेळा अध्यात्म लौकिक यश, प्रसिद्धी मिळवण्यासाठी वापरलेले आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला लौकिक जगात काही अलौकिक व्यक्ती व्यवसाय करूनही अलौकिक समाधान मिळवू शकलेल्या पाहतो. आपल्या सगळ्यांच्याच जगण्यात आपण अलौकीकाचे % वाढवू शकतो, आपल्याच आंतरिक समाधानाच्या झोक्यावर निवांत बसू शकतो. आपल्याभोवती लौकिकाचा एक एक करकचून गुंडाळलेला दोर सोडवत. एकनाथ महाराज किती छान सांगून गेले पहा.
सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥
No comments:
Post a Comment