कित्येक
वेळेला आपण ठराविक प्रसंगात ठराविक प्रतिसाद देतो. आणि त्या situation ला तोच प्रतिसाद कसा obvious आहे, नैसर्गिक आहे, दुसर काही आपण करूच
शकत नाही अस आपल्याला वाटत असत. आजूबाजूच्या लोकांना मात्र आपण तस वागायला नको होत
अस वाटत असत. पण दुसरी कोणतीही प्रतिक्रिया आपल्यासाठी impossibility असते. आणि त्यामुळे इतर कोणतेही वरवर अगदी
logical असलेले पर्याय आपण स्वीकारण्याच्या
मनस्थितीत नसतो. आपले वागणे आपल्याला अगदी योग्य वाटत असते without any doubt.
मला
परवा विचार करत असाताना वडिलांचे एका छोट्या प्रसंगातील वागणे uncalled for आहे असे वाटले आणि एकदम डोक्यात मोठ्ठा
प्रकाश पडला. मला असे जाणवले कि अनेक वेळेला मीहि बाबांप्रमाणेच अतिशय टोकाला जाऊन
निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयांच्या योग्यतेबाबत मला तसूभरही शंका नव्हती. पण
आज या प्रकाशाच्या झोतात ते सर्व निर्णय मी by default कोणत्यातरी mental
habit मुळे
घेतल्याचे जाणवले. ते काही प्रसंगी लोकांना तडफदारपणाचे वाटले असतील पण माझ्यासाठी
ते अगदी सहज घेतलेले होते. कारण अशा प्रसंगात असच वागायचं असत असा लहानपणापासून
समोर पाहून पाहून मी ग्रह करून घेतला होता. तो आज इतक्या वर्षांनी तटस्थपणे
पाहिल्यावर हास्यास्पद वाटतोय.
अधिक
विचार केल्यावर असे लक्ष्यात आले कि लग्न झाल्यावर खूप वेळेला सासरच्या आणि
माहेरच्या मंडळींच्या या ‘by
default mental habits’, at the loggerheads येतात आणि आमच्याकडे असे नसते बुवा अशा
अनेक कुरबुरी होतात. छोट्याछोट्या बाबतीत ते लोक असा कसा विचार करू शकतात असे
प्रश्न पडतात. आपण समजावून वगैरे घेतो, पण मनात प्रश्न राहतातच.
मला
अस वाटत आपण लहानपणी आपले आईवडील, आजूबाजूचे मोठे लोक यांच्या नुसत्या लकबींचे
नाही तर mental habits चे अनुकरण करतो आणि त्या mental habits आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या नकळत भाग
बनून जातात. The logic,
the beliefs with which our parents have lived their lives becomes our second
nature. आपण
मोठे होतो तसतसे आईवडीलांचे विचार खोडून काढतो पण आपल्यात खोल दडलेल्या reaction च्या सवयी आपल्याला limit करतच राहतात. आपल्या आई वडिलांचा worldview व्यापक असेलच असे नाही. पण आपल्यासाठी
आयुष्याची सुरवातीची वर्षें ते जगातील आदर्श व्यक्ती असतात. आणि त्यामुळे बाबा
वाक्यं प्रमाणाम मानून आपण जगात लढायला उतरतो. आज तुमच्या आसपासच्या अनेक विविध
गुणावगुणांनी परिपूर्ण व्यक्ती पहा प्रत्येक जण कुण्या तान्ह्या जीवाचे माता पिता
आणि म्हणून आदर्श आहेत. त्याच त्रयस्थ पणे आपल्याकडे पहा.
टोचून
बोलणे, उचकावणे, चेष्टा करणे, विनाकारण
आपल्या माणसाला पाठीशी घालणे, personally घेणे,
छोट्याछोट्या बाबतीत खट्टू होणे, आदरातिथ्य करणे, listening, magnanimity, आधार देणे, मदतीला धावून जाणे, व्यवहार
चोख ठेवणे, व्यवस्थितपणा, गबाळे पणा, चौकशा करणे, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी
करणे, interfere करणे, स्वातंत्र्य देणे, भोचकपणा करणे,
पुढेपुढे करणे, मागे राहणे, काळजी घेणे, माया करणे, शिस्त लावणे, संयम,
आक्रस्ताळेपणा, micromanage
करणे, सगळे controls आपल्या हातातठेवणे, तुच्छ लेखणे, जनसंपर्क
टाळणे, जनसंपर्काच्या आहारी जाणे, कोणी दुखवू नये म्हणून खोटे बोलणे, गळ्यात पडणे,
चिकित्सा करणे, मागे बोलणे, स्ट्रीट स्मार्ट असणे, आग्रही होणे, ultimatum देणे, हेकेखोरपणा करणे, वेळ पाळणे , उशीर करणे,
माहितगार असल्याचे दाखवणे, चोंबडेपणा करणे, तुसडेपणा करणे, लोकांना मिंधे करून
ठेवणे, गोड बोलणे पण शब्द न पाळणे, टिंगल करणे, उतावळेपणा करणे, चिंगुसपणा करणे,
पाल्हाळ लावणे, चटकन अनुमान काढणे, हातपाय गाळणे, स्वतःला परिस्थितीचा victim समजणे अशा अनेक सवयी आपण सांगू शकू.
आपल्या
एकातरी सवयीचा उगम, आपण वारसाहक्कात शोधू शकलो तर, स्वतःकडे त्रयस्थपणे पाहण्याची एक
पायरी आपण चढू शकू अस मला वाटत. आपल्याकडून नकळत कृती करून घेणाऱ्या याच सवयी,
आपल्या क्षमतांवर चांगला वाईट परिणाम करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेऊनच
सतर्कतेने वाटचाल करणे योग्य होईल.
"टोचून बोलणे, उचकावणे, चेष्टा करणे, विनाकारण आपल्या माणसाला पाठीशी घालणे, personally घेणे, छोट्याछोट्या बाबतीत खट्टू होणे, आदरातिथ्य करणे, listening, magnanimity, आधार देणे, मदतीला धावून जाणे, व्यवहार चोख ठेवणे, व्यवस्थितपणा, गबाळे पणा, चौकशा करणे, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करणे, interfere करणे, स्वातंत्र्य देणे, भोचकपणा करणे, पुढेपुढे करणे, मागे राहणे, काळजी घेणे, माया करणे, शिस्त लावणे, संयम, आक्रस्ताळेपणा, micromanage करणे, सगळे controls आपल्या हातातठेवणे, तुच्छ लेखणे, जनसंपर्क टाळणे, जनसंपर्काच्या आहारी जाणे, कोणी दुखवू नये म्हणून खोटे बोलणे, गळ्यात पडणे, चिकित्सा करणे, मागे बोलणे, स्ट्रीट स्मार्ट असणे, आग्रही होणे, ultimatum देणे, हेकेखोरपणा करणे, वेळ पाळणे , उशीर करणे, माहितगार असल्याचे दाखवणे, चोंबडेपणा करणे, तुसडेपणा करणे, लोकांना मिंधे करून ठेवणे, गोड बोलणे पण शब्द न पाळणे, टिंगल करणे, उतावळेपणा करणे, चिंगुसपणा करणे, पाल्हाळ लावणे, चटकन अनुमान काढणे, हातपाय गाळणे, स्वतःला परिस्थितीचा victim समजणे अशा अनेक सवयी" hats off to exhaustive list....!!!पण जर असे आढळले की यातली एकतरी ही "माझी" आहे... तर? ती आपली खरी आयडेंटिटी असते?
ReplyDeleteकदाचित अशी शंका काढणे हीपण माझ्या आईची मला दिलेली देणगी शकते.
खाण तशी माती
ReplyDeleteएकच शब्द -----अप्रतिम
ReplyDeleteI think making of human being is largely comes from the Gene's he/she inherited from Father n Mother or may be forefathers. Some circumstantial decision could be exception. Introspection about our behaviour or decisions is continuous process be it good or bad. Ashutosh Joshi
ReplyDeletebut all such habits can be changed by aware & persistent efforts
ReplyDeletetrue, but the first important step is the realization that it exists.
Delete