हा ब्लॉग कशासाठी?

जग हा मोठ्ठा पसारा आहे. जगणे समजावून घेताना, काय बरोबर काय चूक, याबाबत आपण लहानपणापासून उलटसुलट विधाने ऐकलेली असतात. त्याचा आपापल्या परीने अर्थ लावत, काही एक भूमिका घेत आपण जगत असतो. कोणालाच ज्याचा आदी अंत कळलेला नाही, अशा या जगात आधी आईवर, मग शिक्षकांवर, कधी पुस्तकांवर, कधी जगाने मोठया ठरवलेल्या व्यक्तींच्या उक्तीवर विश्वास ठेवत, आपण मार्गक्रमण करत असतो. खूप गोष्टी छातीठोकपणे बोलत असतो. एखादी belief system ची फांदी धरून आणि एकदा धरली म्हणून, तिच्यावरची पकड घटट करत, आत्मविश्वासाने जगात वावरायचे technique आपण आत्मसात करतो.
मला हा एकट्याचा आणि सामुदायिक प्रवास बघायला फार मजा येऊ लागली आहे. या सर्व कोलांट्या उड्या, वेगवेगळ्या कोनातून दृष्टीकोनातून पाहताना, त्यातील ताल आणि गती समजत जात आहे, असे वाटते आहे.

समजून घेऊन मगच पुढे जावे, नाही समजले, तर आडून बसावे, हा माझा शिकण्याचा pattern होता. त्या अर्थानी मी slow learner आहे. त्याचमुळे एकेका संकल्पनेच्या मुळाशी जाण्याची, मला नेहमीच आवश्यकता वाटते. त्यातून माझी अनेक विषयांची समज वाढली. रूढार्थाने मी अजिबात अभ्यासू नाही. अभ्यास करायला आवडत नाही, पण समजून घ्यायला आवडते, खोलात शिरुन सत्याचा वास घ्यायला आवडतो. 


यातील बरेचसे सत्य स्वतःच्या आयुष्यावर प्रयोग केल्यामुळे, मला उमजले आणि माझ्या आजूबाजूच्या व्यक्तीमध्येही, ते सहजपणे दिसू लागले. त्यातूनच मनुष्य आणि समाजाबद्दल काही गंमतशीर अडाखे माझ्या मनात फेर धरू लागले.
काही वेळेला प्रत्यक्ष बोलून, मी मित्र मैत्रिणींशी शेअर केले, पण ते अर्धवट हवेत विरून गेले. लिखाणाने, त्या आडाख्यांना नेमकेपणा येईल व त्यावर वैविध्यपूर्ण अनुभव असणाऱ्या लोकांनी चर्चा केली, तर काही सोपी गृहीतके तयार होतील, असे मला वाटते आणि ही आपणच तयार केलेली गृहीतके उलथी पालथी, करून पाहता येतील म्हणून, हा ब्लॉगचा प्रपंच ....

2 comments:

  1. my friend Dr Neha Sharma has communicated her comment on watsapp. She is a Hindi speaking lady and her comment is very precious for me. i am taking this opportunity to publish it. She says, "Started reading your blogs. their Grass is different, is the one I liked most. Will take time to comprehend and understand the Marathi,coz some contexts I am not able to establish. But a good work in progress...thought provoking at places and contemplative at other"

    ReplyDelete
  2. My friend Dilip Karmarkar wrote on FB on 28th Aug -
    " लिंक बघितली, आणखी खरं सांगायचं तर मेपासूनचे तिथे उपलब्ध असणारे सारे लिखाण वाचले, आणि अंतिम सत्य सांगायचे तर, फारसे काही कळले नाही.

    छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप अर्थ दडलेले असतात (शेव आणि म्हातारी). ते समजणे, ही झाली सेन्सिटिव्हिटी. ती तुमच्याकडे नक्की आहे. पण मला स्वतःला नं, आता सेन्सिटिव्ह राहणे, विचार करणे, लिहून काढणे... या साऱ्याचा खूप कंटाळा येतो, आळशी झालोय म्हणा.

    म्हणूनही तुमचा उत्साह, अशाप्रकारे अजून तरुण राहणे कौतुकास्पद वाटतं. लिहीत राहा, माझ्यासारखेच आळशी असणारे बरेच वाचत राहतील, पण प्रतिसाद देतील, इंटरॅक्ट होतील असे नाही. तरीही लिहीत राहा.

    शुभेच्छा."

    ReplyDelete