प्रत्येक
क्षेत्रातले यशस्वी प्रयोग Case studies बनतात. त्या जशा आहेत तशा किंवा कदाचित थोड्या customization नंतर replicate करता येण्यासारख्या असतात. अमुल चा प्रयोग पंतप्रधानलालबहादूर
शास्त्री यांनी समजावून घेतला. तो स्थळसापेक्ष नाही असे लक्षात आल्यावर गुजराथसारखी
दुग्धक्रांती देशभर व्हावी म्हणून वर्गीस कुरीयन याना शास्त्रीजींनी गळ घातली आणि
सर्व राज्यात हि कल्पना रुजवण्यासाठी संबंधीत व्यक्तींना भेटण्याचे प्रयत्न
करण्यासाठी पाठवले. तेंव्हा ‘हे तुमच्याकडे ठीक आहे हो, आमच्या कडे परिस्थिती
वेगळी आहे. अशी काही योजना आमच्याकडे यशस्वी होणे शक्य नाही’ असेच उत्तर त्यांना
महाराष्ट्रात मिळाले. निराश होऊन श्री कुरियन पुढचा प्रसाराचा मार्गच सोडून दिला.
परदेशातील एखादा
यशस्वी प्रयोग असेल तर मग तर काय, सर्वांनी कानच बंदच करून घेतलेले असतात. ‘अहो तिकडे ठीक
आहे, इथे एवढे प्रश्न आहेत, परिस्थिती फार वेगळी आहे इथे, तुम्हाला काही कल्पना नाही.' अश्या प्रकारचे शेरे नेहमी ऐकायला मिळतात.
खरे
तर मनुष्य स्वभाव, समाज, संस्था थोड्या फार फरकाने सगळीकडे सारख्याच असतात.
त्यामुळेच व्यवस्थापनाची पुस्तके असोत, साहित्य किंवा चित्रपट असो, जगभर भाषांतर
करून वाचली जातात, पहिली जातात, वापरली जातात. पण कोणताही initiative घ्यायचा झाला कि मात्र, ‘आमच्याकडे शक्य
नाही’ हि सोपी पळवाट, सहज पटतील अशी किंवा
त्याहीपेक्षा सहज counter
करता येणार नाहीत अशी कारण देऊन, ती शक्यताच झटकून टाकली जाते.
अण्णा
हजारेंचे आदर्शग्राम असो कि अमुलचे उदाहरण असो replication होताना दिसत नाही. कल्पनांचे हे wastage सर्रास का होते. खरेतर आपले विचार करायचे
काम त्या व्यक्तीने सोपे केले म्हणून पुढे होऊन ती पद्धत अनुसरून जलद विकास
घडवता येईल. आपण कितीतरी बाबतीत इतरांचे
अनुकरण करतो. मग case
studies सिद्ध झालेल्या पाहिल्यावर, तपासल्यावर सुद्धा ‘तिकडचे गवत हिरवे आहे हो, आमच्या कडचे कधीच हिरवे होणार नाही’
अस का म्हणतो.
कोणतीही संकल्पना हिरीरीने शिकवताना त्यासंबंधीची यशस्वी उदाहरणे दिल्यावर, त्यासारखी अगदी आपल्या अनुभवातली उदाहरणे दिली तरीही, उत्साहावर विरजण पडणारा असा response मला कधीच हाताळता आला नाही. तुमचा काय अनुभव आहे? यावर उपाय काय?
कोणतीही संकल्पना हिरीरीने शिकवताना त्यासंबंधीची यशस्वी उदाहरणे दिल्यावर, त्यासारखी अगदी आपल्या अनुभवातली उदाहरणे दिली तरीही, उत्साहावर विरजण पडणारा असा response मला कधीच हाताळता आला नाही. तुमचा काय अनुभव आहे? यावर उपाय काय?