हि
मला म्हण फार मोठी insight
देऊन गेली. आई हि
आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती. ती सुद्धा आपल्याला नकोशी होऊ शकते. हे बोलताना
अवघड वाटत, कारण it is not
politically right. पण
ज्याअर्थी हि म्हण तयार झाली त्याअर्थी हि सार्वत्रिक भावना असावी.
मावशी हि
आईच्याच संस्कारात वाढलेली पण भाच्यापासून लांब राहणारी, हिंदीत तिला मॉसी
म्हणतात म्हणजे मॉ जैसी, त्यामुळे ती fascinating वाटते हवीहवीशी वाटते. ती
रोज जवळ नसल्याने तिच्या irritating
सवयी, दोष बोचत
नाहीत
याचा
मतितार्थ मला असा वाटतो कि, close relationships या निभवायला नेहमीच अवघड
असतात. नात्यात दोन व्यक्तींचा परस्पर संबंध असतो. कोणतीही व्यक्ती आदर्श नसते.
आणि आपल्याला हवी तशी तर मुळीच नसते. प्रत्येक व्यक्तीचा एक बाज असतो. पण परस्पर
संबंधात आणि विशेषतः निकट संबधात प्रत्येक जण आपल्या कृतीला, विचारांना मुरड घालतो.
पण जवळच्या नात्यात, सोबतच्या व्यक्तीला आपण इतक गृहीत धरतो, कि कधीकधी ती व्यक्ती
दुखावली जाते, खट्टू होते. त्या व्यक्तीने आपल्यासाठी नेहमी हजार असावे अस
आपल्याला वाटत. ती व्यक्ती पण एक माणूस आहे, तिला तिच्या इच्छा आकांक्षांना मुरड
घालावी लागतीय हे बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही
.
आपण
इतके जवळ असतो कि अनेक बर्यावाईट प्रसंगात आपण एकमेकांना खर्या अर्थाने जवळून
पाहिलेले असते. त्यामुळे त्या व्यक्तीतील हीन गोष्टीही आपल्याला माहित असतात.
नात्यावर परिस्थितीने फार ताण आला, तर त्या वाईट गोष्टीच जास्त उगाळल्या जातात.
अशा वेळी ज्या व्यक्तीने आपल्यासाठी सर्वस्व वेचल तिच्या बाबतीत सुद्धा ‘माय मरो’
ची भावना मूळ धरू लागते
प्रत्येक
नात परस्परावलंबी असत, हे ‘अवलंबित्व’ दरवेळेला आपल्या इगो ला झेपतच अस नाही. तसच
खूप वेळा जवळच्या नात्यात said
unsaid अपेक्षांची एक गुंफण असते त्याची आपल्यालाही
जाणीव नसते. बाहेरचे जग हे वरवरच्या नात्यांनी भरलेल असत. तिथे मिळालेली सुख दु:ख,
मानापमान यांची सगळी कसर close
relationships भरुन
काढतात. असे असूनही या नात्यांच्या बाबतीत आपण इतके आग्रही असतो कि त्यांच्याशी
असलेल्या communication आपल्याला जराही उन्नीस बीस चालत नाही.
एखाद्या
पाळीव प्राण्यावर प्रेम करण सोप असत पण आपल्याच सारख्या complex व्यक्तीसोबत प्रेमाचे नाते निभावणे अवघड असते. आणि या अवघड परीक्षेतच
माणसाची growth दडलेली असते. ज्याच आपल्यावर खूप प्रेम आहे किंवा आपल जिच्यावर प्रेम आहे त्या
व्यक्तीसाठीच आपण आपल्याला बदलायला तयार असतो. आपल्या growth च दार आतून उघडत म्हणतात. जवळच्या
नात्यातले ताणताणाव हे दार उघडायला भाग पडतात. पण या नात्यांची तुटेपर्यंत परीक्षा
बघण नक्कीच योग्य नाही. जवळच्या नात्यांना space दिली तर आईची मावशी होऊन जगण सुकर होईल का?
