माझ्या मागच्या blogpost वर growth म्हणजे नेमक काय? याबद्दल
काही प्रश्न उपस्थित झाले. मीही त्या पश्नांमुळे त्याबाबत नीट विचार करू लागले,
आणि सगळ्यानांच हि चर्चा वाचता यावी म्हणून separate post च
टाकायची ठरवली.
watsapp मुळे जुन्या मैत्रिणींचा परत संपर्क झाला,
सुमा भेटली आणि मी हरखूनच गेले. तिने आयुष्य ज्या सहजतेने आणि
आनंदाने पेलालेय ते पाहून आतून आनंद झाला. लौकिक अर्थानी तिने जीवनात फार काही
विशेष मिळवलं होत अस नक्की नाही, कौटुंबिक पातळीवरही विशेष
उल्लेखनीय काही नाही. पण तरीही तिला भेटून फार छान वाटत होत. काहीतरी साध्य केल
होत तिने, जे शब्दात पकडण अवघड होत. पण एक
चिरंतन आनंद जो कोणत्याही परिस्थितीत सुकणार नाही अस काहीतरी वाटल तिला पाहून.
जीवन प्रवाही आहे तुम्ही थांबून
राहिलात तर साचलेपण येत. माझी मैत्रीण सुमा, growth चा उत्तम नमुना आहे अस मला
वाटत. याचा अर्थ आनंदी माणूस हा growth झाल्याचे परिमाण आहे का, तर अगदी तसेही नाही. आणखी एक मैत्रीण भेटली
ती खूप कुरकुर करत होती, तक्रारी सांगत होती आणि
उत्तर शोधण्याचा प्रयत्न हि करत होती. तिला भेटूनही छान वाटले, ती आनंदी नव्हती तरीही.
कारण तिच्या तक्रारी या पूर्वीपेक्षा वेगळ्या आणि वरच्या maturity level च्या
होत्या. आयुष्यात सुख दुखे येणारच आहेत पण आपण एखाद्या destination ला
किती वेळ थांबतो जुन्या सुखात आणि दुखात किती गुंतून राहतो हा कळीचा मुद्दा आहे
त्यामुळे मला असेही लक्षात आले कि
अगदी एखादा आनंदी, विनोदी मित्र हि काही
दिवसांनी कंटाळवाणा वाटू शकतो, जर तो आयुष्याकडून शिकून पुढे वाटचाल करत नसेल तर.
growth चा मला कळलेला अर्थ unleashing the potential हा आहे. रोज अनुभवातून
काहीतरी शिकायचं, निरुपयोगी गोष्टी विसरायच्या (unlearning), आपल पात्र थोड थोड मोकळ करायचं, स्वतःला खूल करत जायचं, मनाची कवाड उघडायची, स्वतःच्या विचारावर बसलेली पुट काढायची, मनातील गाठी सोडवायच्या, सत्याची एक एक पाकळी उमलत जाण्याचा आनंद घ्यायचा.
आपणच आखलेल्या,
सवयीने जडलेल्या, समाजाने घालून दिलेल्या,
परिस्थितीने निश्चित केलेल्या लक्ष्मण रेषांचे बदलते स्वरूप समजून
घ्यायचे आणि त्या बंधनातून किमान विचारांच्या स्तरावर तरी मुक्त व्हायचे. आपण
कोणत्या तरी भीतीमुळे एखाद्या विचाराला चिकटून बसलोय का हे नितळपणे पाहायला
शिकायचे.
Growth म्हणजे आपण जे ‘given’ म्हणून घेऊन निघालो आहोत ते तपासता येण. मेणबत्तीने चटका बसल्यावर 'मेणबत्ती म्हणजे फक्त चटकाच' असा परिस्थितीचा बाऊ न करता इतर शक्यतांना open राहण.
आजच्या जगात जेंव्हा सगळ्याच
बदलांचा speed वाढला आहे तेंव्हा माणसाचा growth rate also matters. लौकिकअर्थाने growth होताना सुद्धा माणूस म्हणून विकास होतो by default काहीवेळेला पण त्याची खात्री नसते. लौकिक अर्थाने सर्व आलबेल असलेल्या व्यक्तीला जेंव्हा आयुष्यात स्थिर वाटत
नाही, शांतता लाभत नाही तेंव्हा growth as person, not as a role कशी महत्वाची आहे हे
उमगायला लागत.
त्यामुळे आयुष्याच्या प्रवाहाशी आपले
सूर जितके जुळतील, जितके कमीतकमी resist होऊन
सहज जुळतील, तेवढे आपण प्रफुल्लीत, आत्ताच उमलल्यासारखे राहू. जर का थांबलो, स्वतःची growth resist करत राहिलो, तर साचलेपणा येईल.शिळे होऊन जाऊ.