Wednesday, October 26, 2016

शब्दांच चिलखत




मी ‘पिंक’ पहिला. Theatre मधून बाहेर येताना थोडी अंतर्मुख, जरा अस्वस्थ झाले होते. कलाकृती तून जे मिळाले ते साठवून घ्यायचा प्रयत्न करत होते. माझ लगेच काही करकरीत मत तयार झाल नव्हत सिनेमाबद्दल. आत कुठेतरी बसलेल्या धक्क्यांनी नाजूक झालेला माझा मनाचा भाग तसाच हळवेपणानी जपावासा वाटत होता. शेजारच्या व्यक्तीशी औपचारिक पणे लगेच त्या movie बद्दल चर्चा करावी अस वाटत नव्हत. 
 
पण चर्चा सुरु झालीच. चर्चा करणाऱ्यामधे काही बायकापण होत्या, चित्रपटात दाखवलेल्या प्रसंगांच्या, स्वतःच्या आयुष्यात जवळ जाऊन आलेल्या. plot मधल्या त्रुटी, अमिताभ च कौतुक, ती काय छान दिसलीय ना, अमुक साली English picture आला होता त्याची copy आहे, अमुक राज्यातले लोक स्त्रियांशी असेच वागतात म्हणून तो accent तसा घेतलाय वगैरे वगैरे. 

कलाकृतीतून तो कलाकार काहीतरी व्यक्त करू पाहतोय, अतिशय तरलपणे, ते पोहोचतंय ना आपल्यापर्यंत? त्यातल्या कित्येक गोष्टी आपल्याला हादरवून टाकणार्या  आहेत, तुमच्या आमच्या जवळ त्या घडताहेत, भीतीदायक आहेत, माझे स्वतःचे विचार परंपरेच्या नावाखाली त्या चुकीच्या विचारांच्या जवळ जाणारे आहेत हेही जाणवतंय. कलाकार ज्या महत्वाच्या बाबी कडे आपल लक्ष वेधू इच्छितोय ते सोडून सगळेजण वेगळ्याच गोष्टींबद्दल हुशारी का दाखवतायत हे मला कळेना 

मला वाटल नकळत पणे हा आपल्याला चीत करणारा तरल विचार, सगळी मंडळी dodge तर करत नाहीयेत ना. तो विचार कलाकाराच्या कौशल्यामुळे, माझ्या अंतरंगाच्या नाजूक गाभार्यात शिरला, तर तो मला हळवा करेल. माझा खंबीर पणा धोक्यात आणेल म्हणून आपल्या नाजूक, हळव्या मनाला सर्वांनी शब्दांच, विचारांचं, हुशारीच चिलखत तर घातल नव्हत ना. 

हि कसली भीती आहे नेमकी? मी तर योग्यच आहे, मला नागव करण्याचे प्रयत्न मी हाणून पाडीन. मी नीटच आहे, माझ्यावर प्रभाव पडायचे प्रयत्न मी सहज वरच्या वर उडवून टाकीन. मी खर तर आतून खूप soft आहे, पण त्याला जगासमोर उघड केल तर जग माझा गैरफायदा घेईल अस लहानपणापासून बिम्बवलय त्यामुळे माझ्यातल्या त्या softness पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणी केला, तर तो मी हाणून पाडीन. का आत शिरून या विचारांनी माझा ताबा घेतला, तर मी इतके दिवस चुकीचा होतो हे मान्य कराव लागेल ?

या किंवा यासारख्या अनेक कारणांमुळे  माझ्या मनात जे चर्र झाल, ते मी शब्दांच्या वायफळ उधळणीखाली लपवतोय का? जिथे message personally  घ्यायला हवा तिथे तो generalize करून माझ्यापेक्षा लांब न्यायचा प्रयत्न करतोय का मी? एखादा खरा विचार, नितळ विचार जवळ येतोय असे म्हटल्यावर, शब्दांचे चिलखत घालून त्याच्यापासून स्वतःला वाचवतोय का मी?

मी एकदा चेरापुंजी ला गेले होते. तिथल निसर्ग सौंदर्य इतक अंगावर येणार होत, कि आता मरण आल तरी चालेल असा विचार मनात आला. त्या सौंदर्यात न्हाऊन निघत असताना आमच्या पैकी एकानी ‘किती छान ना वगैरे’ बडबड सुरु केली. इतका रसभंग झाला. पण नंतर असाही वाटलं कि माझ्या मनात आलेला मृत्यूचा विचार आणि त्या व्यक्तीच्या मनात आलेला स्वतःच्या छोटेपणाचा विचार एकाच जातकुळीचे होते का? त्याला वाटलेल्या insecurity तूनच जमेल त्या तोकड्या शब्दात त्यांनी त्या निसर्गाचे वर्णन सुरु केले होते. त्या असिम भव्यतेला आत शिरू द्यायचं नव्हत का त्याला?

प्रत्येक माणूस आतून फार soft असतो, हा हळवेपणा आपण, जीवनातील अनुभवांपासून protect करायला पाहतो का?