Wednesday, December 28, 2016

काय करणार? अस वागाव लागत जगात

जगात असच वागाव लागत अस आपण लहान पणापासून ऐकत आलो आहोत. वेगवेगळ्या काळात हे असच असत याबद्दलचे parameters बदलत गेले आहेत. हुंडा द्यावाच लागतो, वधूपक्षाला पडत घ्यावाच लागत, admission साठी donation द्यावच लागत, हल्ली पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, शासनात रहायचं तर त्यांच्यापैकी एक होऊन रहाव लागत, अशा अनेक collective beliefs आपण समाज म्हणून बाळगत असतो. 

अगदी कधीही सरकारी office ची पायरी न चढलेली एखादी गृहिणी सुद्धा खात्रीने भ्रष्टाचाराबद्दल बोलते. सर्वच जण या समजुती पडताळून न बघता सत्य म्हणून गृहीत धरून चालतात. कित्येक वेळेला त्या समजुती योग्य नसल्या तरी त्यांना विरोध करणे सोयीचे नसल्यामुळे त्यांना बहुतेक जण succumb होतात आणि सहज सोप्या रस्त्यावर मार्गक्रमण करतात.

अशीच एक मोठ्ठी belief यापूर्वी प्रचलित होती ज्यात सर्व सामान्य माणस अडकली होती. ‘इतना तो black चालता ही है’ Demonatization च्या झटक्याने त्या सामन्यांच्या समजुतीला सुरुंग लावला. कायद्याला गृहीत धरण्याची वृत्ती तयार झालीय, तिला काही प्रमाणात चाप लागला . पिंक सिनेमा ने drinks घेणारी मुलगी ही available असते या belief ला challenge केले. आम्ही कचर्यासंबंधी  पुण्यात जो प्रयोग केला तेंव्हा भारतीय माणूस indisciplined असतो ही belief challenge केली. System व्यवस्थित असेल तर लोक कचरा संकलनास नक्कीच शिस्तीने हातभार लावतील या विश्वासने आम्ही काम केल आणि लोकांनीही हा विश्वास सार्थ ठरवला.

पण स्वच्छ भारत मिशन ने भारतीय indisciplined आहेत ही धारणा पक्की केली. लोक ऐकत नाहीत त्यांना शिकवलं पाहिजे अश्या समजुतीने सगळे एकमेकांना 'लोक' म्हणू लागले आणि guilt देऊ लागले. या समजुतीच्या एका छोट्या चुकीसाठी आपण खूप पैसे प्रबोधनावर खर्च करू अशी मला भीती वाटते

जेंव्हा मोठी सुधारणा करणे अपेक्षित असते तेंव्हा समाजात रुजलेल्या या collective beliefs ना challenge करणे गरजेचे असते अन्यथा आपण कडेकडेने जात incremental improvements साधू शकतो. बदल समाज स्वीकारणार नाही या भीतीनेही बरेचसे leaders असलेल्या श्रद्धा जोपासत पुढे जाऊ पाहतात.

चुकीच्या समजुती challenge करण्याचे धैर्य ज्यांनी दाखवले त्यांनी इतिहास घडवला. नंगेसे खुदा डरता है ही म्हण positively घेतली तर कित्येक वेळेला या समाजाच्या बागुलबुवा ला आपण हादरवून सोडू शकतो.बहुतेक आपल्या लक्षातच येत नाही कि इतिहास घडवणारी माणस तुमच्या आमच्यासारखी सामान्याच होती. पण त्या काळात समाजात  रुजलेला एखादा फंडा challenge केल्याने ती मोठी झाली.

जिजाबाईला शिवाजी ची आई म्हणून न पाहता त्यावेळच्या अनेक सरदारांपैकी एका सरदाराची बायको म्हणून पहा. इतर सरदाराच्या बायकांची नावेही आपल्याला माहित नाहीत. पण या सरदारीण बाईने आजूबाजूच्या परिस्थितीत चालू असलेला अन्याय पहिला आणि त्यासाठी पेटून उठली आणि अतिशय मुत्सद्दीपणाने समाजाच्या परकीयांना शरण जाण्याच्या मानसिकतेवर आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या माध्यमातून हल्ला चढवला. 'काय करणार, परकीयांची चाकरी केल्याशिवाय काही गत नाही' ही belief तिने challenge केली  आपण त्यानंतर चा इतिहास जाणताच.


त्यामुळे जगात असच वागाव लागत, असच असत, अस करावाच लागत, हे असच चालायचं ही वाक्य मोठी घातक असतात. ही समाजाला नपुंसक बनवतात. त्यामुळे कधीही अशी वाक्य ऐकलीत कि सावध व्हा, आणि शक्य झाल्यास इतरांना सावध करा. या गृहितकांना आपण निदान चर्चेत आव्हान द्यायला लागलो तरी अनेक अनावश्यक गोष्टीना आपण पायबंद घालू शकू अस मला वाटत. 

Friday, December 2, 2016

शब्दांच्या पलीकडले



एखाद्या situation मधे एखादा शब्द चपखल बसतोय अस वाटलं कि आपण तो वापरून टाकतो आणि पुढे जातो. पण सत्य त्या शब्दापेक्षा व्यापक आहे का याकडे फारसं लक्ष्य न देता आपण विषय संपवून टाकतो. वाचन करताना किंवा अभ्यास करताना सुद्धा आपण एका शब्दावरून दुसऱ्या शब्दावर उड्या मारत विषय समजावून घेतो. आणि बुद्धीला कळले किंवा कळल्यासारखे झाले कि त्या विषयात पुढे पुढे जात राहतो. काहीश्या अवघड किंवा ज्याला अनेक शेड आहेत अश्या शब्दांच्या सहाय्याने संवाद साधत राहतो.  कितीतरी जड किंवा अर्थगर्भ शब्द लीलया वापरतो आणि त्यांना गुळगुळीत करून टाकतो.

वस्तु दर्शविणाऱ्या शब्दांपेक्षा  concepts स्पष्ट करणारे शब्द फसवे असतात. ‘विश्वास’ हा शब्द  इथे उदाहरणादाखल घेऊ. आपण हा शब्द सर्रास वापरतो, अगदी तावातावाने ‘माझा तुझ्यावर विश्वास आहे’ असे मित्रांना किंवा  सहकाऱ्यांना  म्हणतो. पण या वाक्याचा प्रत्येक संबंधाबरोबर, व्यक्तीबरोबर अर्थ बदलतो. बोलताना आपल्यालाही माहितही नसते कि या वाक्याला, आपल्याच मनात एक qualifying clause आहे. म्हणजे तू माझ्या अपेक्षेप्रमाणे वागलास तरच मी हा विश्वास continue ठेवणार आहे. किंवा या या परिस्थितीत माझा तुझ्यावर विश्वास आहे, इतर परिस्थितीत असेलच असे नाही. खरतर आपण विश्वास एका limit पर्यंतच ठेवतो का ? आपल्या जीवावर, belief system वर, image वर, ego वर बेतेपर्यंत आपला विश्वास टिकणार नाही कदाचित हे आपल आपल्यालाही माहित नसते. तरीही रोज सकाळ संध्याकाळ’ विश्वास; या शब्दाभोवती फिरणाऱ्या अनेक पोस्ट forward करत राहतो आणि त्या शब्दाचे कंगोरे बोथट करत त्याला गुळगुळीत करतो. पर्यायाने आपण ‘विश्वास’ या शब्दाने व्यक्त होणाऱ्या संकल्पनेची खोली आणि नानाविध आयाम जाणून घेण्यात कमी पडतो.

तीच गोष्ट sensitivity ची. माझ्या ‘मनाला लागल’ अस आपण म्हणतो आणि सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतो. मनाला लागल’ हा शब्द वापरल्यावर, शब्द हेच सत्य समजून तिथेच विचार थांबवतो. मनाला काय लागल ? का लागल ? मन म्हणजे ego ला तर नाही ना लागल ? याचा फार विचार न करता त्या शब्दाची उब घेऊन आपला स्व कुरवाळतो. मात्र एखादी बहिणाबाई ही त्या शब्दापाशी न थांबता, मनाचे वेगवेगळे कारनामे समजावून घेऊन, अस्तित्वाच्याच तळाशी जाऊ शकते.  

मी training च्या क्षेत्रात काही वर्ष होते. खरेतर training  या शब्दात इतके काही सामावलेले आहे. कुणाला, कधी, कुठे, कुणाबरोबर, कसे, किती ट्रेनिंग द्यायचे? ते कसे evaluate करायचे? ती व्यक्ति अथवा समूह शिकतो म्हणजे नेमकं काय होत? त्या शब्दाला इतकी connotations आहेत, कि ट्रेनिंगचा पूर्ण अर्थ मी आजही समजू शकले नाहीये. पण बऱ्याचदा, अनेक lectures किंवा activities च प्रशिक्षणार्थींना शिकवण्यासाठी केलेलं कडबोळ असा training चा ढोबळ अर्थ रूढ झालेला दिसतो, जो रोजच्या व्यवहारासाठी ते पुरेसाहि आहे. पण या क्षेत्रात  रोज काम करणाऱ्या व्यक्तींनी  अधिक खोलात शिरून, स्वतःच्या अनुभवाला व्याख्येशी ताडून पाहून सातत्याने आपली या संकल्पनेविषयीची समज प्रगल्भ बनवत गेल पाहिजे असं मला वाटत.

अशा संकल्पना प्रत्येक क्षेत्रात असतात, त्या त्या क्षेत्राची वेगळी अशी jargon असते. तिच्यावर प्रभुत्व मिळवून इतरांना impress करता येते पण तिच्या पोटात शिरल्याशिवाय त्या क्षेत्रात भरीव कामगिरी करता येत नाही. या मानवजातीच उद्दिष्ट जगाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणे हे आहे. शब्दांच्या आधारानी आखून दिलेल्या मार्गावर चालता येते पण विकासाची वाट निर्माण करता येत नाही.  शब्द कळला, बुद्धीला कळला, logically कळला म्हणजे ज्ञान प्राप्त झाले असे नाही. खऱ्या प्रसंगात, आयुष्याच्या अनुभवात, रोजच्या जगण्याच्या प्रकाशात या शब्दांकडे नित्यनवीन नजरेने परत परत पहिल्यासच हे आशयघन शब्द आपल्याला ज्ञानाच घबाड उघडून देऊ शकतात. नुसती शब्दफेक उथळपणाकडे अंगुलीनिर्देश करते. वाचकाला अथवा श्रोत्याला खोल आणि उथळ शब्दातला फरक नेहमीच कळत असतो. या presentation च्या युगात सुद्धा योग्य शब्दांपेक्षाही आशयाच्या खोलीलाच पसंती मिळते.