Wednesday, April 12, 2017

Innocent crime

भारतातल्या लोकांना conflict of interest कळतच नाही, अशी मार्मिक टिप्पणी माझे वरिष्ठ अधिकारी यांनी tweet द्वारे केलेली, वाचनात आली. त्याचं म्हणण मनापासून पटल, कारण अगदी भल्या भल्या अधिकारी- पदाधिकाऱ्यांना मी तसं वागताना पाहिलं आहे. आपला माणूस, माझा जिल्हा, आपल्या समाजाचा माणूस, त्यासाठी मी काहीतरी केल पाहिजे असे अनेक उच्चपदस्थांना वाटते, व त्यांचे अश्या स्वरूपाचे निर्णय पाहणाऱ्या आणि राबवणाऱ्या अधिकारी, कर्मचार्यानाही त्यात काही वावग वाटत नाही. त्याबाबत ‘अरे, आपल्या लोकांसाठी एवढ पण नाही करणार का राव?’ अशी फुशारकीही मारली जाते. Meritocracy आणि fair chance च्या तत्वाला हरताळ फासला जातो. प्रधान साहेबांच्या त्या tweet ला retweet करताना मी म्हटलं Sir, they do it innocently.

तेंव्हापासून हा विषय डोक्यात घोळत राहिला. मी लहानपणी डोंबार्याचा खेळ अनेकदा पहिला आणि त्या कसरतीचा आनंदहि घेतलेला आहे. पर्यटन क्षेत्रात काम करताना एकदा सोलापूरहून एक कलाकारांचा समूह मुंबईत कार्यक्रम करण्यासाठी आला होता, त्यात डोंबारीही होते. त्यांचा कार्यक्रम झाला, त्यात लहान मुल होती. त्यांच्या कसरती आणि धाडसी खेळ पाहून मी थोडी अस्वस्थ झाले. माझ्याशेजारी north-east मधील एक अधिकारी स्त्री बसली होती. ती मला म्हणाली Kishori this is not culture, हे योग्य नाही. मलाही काहीतरी खटकत होतच. लहानपणची मी innocent होते, पण आता सभ्यतेचे शिक्षण मिळालेले माझे मन हे मानवाधिकार व इतर गोष्टीनी संस्कारित झाले होते. लहानपणी करमणुकीची वाटणारी गोष्ट मला आता inhuman वाटायला लागली होती. जल्लीकत्टू, बैलांच्या झुंजी हि ताजी उदाहरणे तशाच स्वरुपाची आहेत.

स्त्रीमुक्ती चा प्रवास हा या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. स्त्रियांचे मुंडण कित्येक मायाळू मातांनी योग्य आणि मुलीच्या भल्याचे असे समजूनच केले असेल. स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनांबाबत आपल्या डोळ्यादेखत होत असलेले बदलही आपण गेले काही दशकं पहिले आहेत. काही वर्षापूर्वी आवडीने स्वैपाक करणाऱ्या स्त्रिया आता स्वैपाकाला हळूहळू drudgery समजू लागल्या आहेत. तुच्याकडे बाई नाही स्वैपाकाला? असा पायरी दाखवणारा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आणि स्त्री पुरुषांमधले पूर्वी logical वाटणारे श्रमविभाजन (घरातली कामे आणि बाहेरची कामे), आपण आता question करू लागलोय. नवरा आल्या आल्या चहा करून देण्यातला संस्कृती तला romanticism हळूहळू कमी होऊन, काही वर्षांनी सुप्रीम कोर्ट नवर्याने चहाची केलेली मागणी अन्यायकारक ठरवेल का? असा अतिशयोक्त विचारही माझ्या मनाला शिवून गेला. म्हणजे समाजाने आणि पर्यायानी सर्व व्यक्तींनी स्वीकारलेल्या गृहितकांना व त्याप्रमाणे केलेल्या innocent कृतीला कालांतराने अयोग्य वर्तन मानले जाऊ शकते.

मनुष्य प्राणी हा तार्किक, भावनिक, शरीरीय, सांस्कृतिक अशा अनेक दरडींवर पाय ठेवून जगत असतो. ज्या गोष्टी आज अतिशय स्वाभाविक वाटतात त्या time machine वर  पुढे जाऊन  जाऊन पहिल्या, वेगळ्या संस्कृतीच्या चष्म्यातून पहिल्या तर illogical, हास्यास्पद अगदी मूर्खपणाच्या पण वाटतील. पण त्याच मूर्खपणाच्या गोष्टी तो समूह मन लावून authentically समरसून करत असतो.  सामुहिक मूर्खपणाविरूद्धचे तार्किक विधान हे त्या काळात(contemporary), पचनी पडणारे नसते. तो मूर्खपणा किंवा पुढे ज्या गोष्टी कदाचित गुन्हा ठरतील अश्या बाबी अतिशय innocently केल्या जातात, कारण तो समाज त्यातल्या छुप्या अन्यायाबद्दल aware नसतो.

व्यक्तिगत जीवनातही आपण अनेकदा आपल्या समजुती, पूर्वग्रह, righteousness च्या प्रभावाखाली राहून अगदी आपल्या जवळच्या व्यक्तींशीही अन्यायकारक, अयोग्य किंवा harsh वागतो. अगदी आपले सर्वस्व असलेल्या आपल्या मुलांशीही. कारण आपण अगदी खात्रीपूर्वक काही धारणा करून घेतलेल्या असतात. तो so called ‘अन्याय’ योग्यच आहे असे आपल्याला मनोमन वाटत असते. त्याअर्थाने आपण innocent असतो. Philosophy मध्ये याला unconscious behavior असे म्हणतात. जागे व्हा ‘be aware’ असे सांगितले जाते. Unconscious कृतीकडून consciousness कडे होत जाणारा प्रवास हा खरा विकास मानला जातो.

येशूने हि अंतसमयी ‘Father, forgive them, for they know not what they do.’ अस म्हटलं होत. Was he speaking about this type of innocent crime?