Friday, November 24, 2017

Showstopper excuse

काही महत्वाच्या विषयांवर किंवा पेटलेल्या विषयांवर, मित्रमंडळी जमल्यावर, सोशल मिडिया वर आपण नेहमीच तावातावाने चर्चा करतो. जसे काश्मीर प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, मुस्लीम महिलांचे प्रश्न, नवीन पिढीचे प्रश्न, साधक बाधक चर्चा होते. अगदी टी व्ही वरील चर्चा ऐकल्यावर सुद्धा, जेंव्हा त्यावर घरी चर्चा होते. या चर्चांचा शेवट मात्र निर्णायक नसतो तर काही हताश generalizations नी होतो

आपली शिक्षण पद्धती याला कारणीभूत आहे काय करणार
स्वच्छता होणार नाही, आपली लोक इतकी बेशिस्त आहेत
आजकालची मुल इतकी practical आणि materialistic झालीयेत, कुठे जाणार आहे हे सगळ देवजाणे
इतक साध कस कळत नाही लोकांना, हे न शाळेच्या अभ्यासक्रमातच समाविष्ट केल पाहिजे
कठोर कार्यवाही केलीच पाहिजे, सुधारणार नाहीत हे लोक त्याशिवाय  
कधी सुधारणार हे राजकारणी लोक
लोकांना इतकं साध कसं कळत नाही 

आणि या विधानानंतर चर्चाच थांबते.  अशी काही विधान आपणही नेहमीच ऐकली असतीलवापरली असतील. ती इतकी generalized असतात कि ती challenge केली जात नाहीत. आणि पुन्हा पुन्हा वापरल्याने हि वाक्ये सत्य आहेत अशी समाजाची ठाम समजूत होते. या काही सामाजिक धारणा आहेत त्या आपण सर्वांनी थोड्या फार फरकाने मान्य केलेल्या असतात, अन इथे आल्यावर सर्वांची मती कुंठते. बहरात आलेली सामाजिक प्रश्नावरची चर्चा एकदम थांबूनच जाते. मी या पद्धतीच्या चर्चेच्या अंतिम थांब्याला show stopper excuse म्हणते.

सामाजिक प्रश्न हा बहुआयामी असतो त्याचे पूर्ण आकलन करण्याची क्षमता नसल्याने समाजमन काही समजूतींकडे झुकते. काही चर्चा त्या त्या गटाच्या belief system प्रमाणे कधी उजवीकडे तर कधी डावीकडे जाऊन थांबतात. कधी कधी वाटते कि डबा खाताना, कॉफी सोबत होणाऱ्या या चर्चा हा आपल्या मनोरंजनाचा एक भाग असतो का ? चर्चेमध्ये प्रश्न सोडवायची जबाबदारी कोणाचीच नसते, पण तरीही सर्वांचा concern आणि पोटतिडीक खरी असते. एकदा डोक्यातील प्रश्नांच्या pressure cooker मधली हवा काढून टाकली कि इतर गप्पांना उधाण येत. ‘games people play या पुस्तकात psychiatrist, Erik Bern ने माणसे एकत्र भेटली कि काय बोलतात, ग्रुप कसे तयार करतात, कोणत्या विषयावर चर्चा करतात याचेही विश्लेषण केले आहे. त्याची मला इथे आठवण येते. या चर्चांमुळे सकृतदर्शनी काही फारसं नुकसान होत नाही, पण समाजात काही beliefs रुजल्या जातात, पक्क्या होत राहतात.

खरा प्रश्न असा आहे कि समाजकार्य करणारी मंडळीही आपल्याच समाजाचे घटक असल्याने, त्यांनीही अश्या चर्चा लहान पणापासून ऐकलेल्या असतात. प्रत्यक्षात समाजासाठी काम करताना, सामाजिक प्रश्नांबाबत मोठे निर्णय घेताना, लहानपणापासून वाटेत भेटलेल्या या showstopper excuses त्यांचीही वाट आड्वतात, असे पाहायला मिळते.

मी गेल्या काही महिन्यात दोन महत्वाच्या लोकांचे विचार ऐकले, ज्यांनी प्रत्यक्ष field वर काम केले आहे आणि ज्यांना त्यांनी ज्या क्षेत्रात काम केले त्याबाबतीतले सत्यत्याचे कंगोरे, त्याचे वजनत्याची परिमिती समजली आहे. त्यातील गोष्ट त्याची आर्द्रता कळली आहे. मुख्यतः सत्याचे प्रवाहीपण त्यांना आकळले आहे आणि ती जाणून घेण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलेले आहे. श्रीमती नीलिमा मिश्रा आणि श्री संजय नहार यांचे विचार ऐकताना मला लक्षात आले कि सत्याच्या दलदलीत उतरल्यावरच प्रश्नाची उकल करणारी कमलांची बीजे कुठे आहेत हे जाणवू शकते. हा वेगळा, अभ्यासातून आलेला विचार आत्मसात करण्यासाठी आपला समाज परिपक्व आहे का? तर असं वाटतंय कि तो विचार करणारा असूनही showstopper excuses पाशी थांबलेला आहे. बहुसंख्य संमाज या सत्यापर्यंत पोहोचण्याऐवजी showstopper excuses च्या प्रेमात पडून प्रश्नाची उकल होऊ देण्याच्या प्रक्रियेत अडथळा बनतो आहे.

या popular समजांच्या विरोधात जाऊन योग्य निर्णय घेण्यास  लोकशाही राज्यपद्धतीतील नेतेही कचरतात. मात्र  नेमके इथेचविशेषतः लोकांची नाडी आपल्याला नीट कळलीय असे वाटणारे लोक जास्ती परंपरागत belief system चे शिकार होऊन निर्णय घेताना दिसतात

जिथे सर्वांचा विचार नेहमी हतबलतेने थांबतो, तिथेच नेमकी स्वतःच्या धारणावर अविश्वास दाखवण्याची गरज असते. इथेच परिस्थितीला काही योग्य प्रश्न विचारण्याची गरज असतेइथेच गृहीतक तपासण्याची गरज असते. इथेच थोडे खोदकाम केल्याने भुयाराचे दार सापडण्याची शक्यता असते. अगतीकतेने प्रश्न बोळवून टाकण्यापेक्षा त्याची खर्या अर्थाने उकल करण्याकडे मार्गक्रमण करणे शक्य असते. Lateral thinking, out of box thinking या सध्या popular झालेल्या concepts चा वापर छोट्या छोट्या समस्यांच्या बाबतीत बरेचदा होताना दिसतो. ज्यांनी या skill चा वापर मोठ्या बदलांसाठी केला त्यांचे शोध हे समाजात game changer ठरलेले आपण जगाच्या इतिहासात पाहतो.

मला नेहमीच असे वाटले कि showstopper excuses are potential gateways,  for reaching out to the game changing thought.  कोणतीही समस्या सोडवणे शक्य असते. त्यासाठी तिच्या मुळाशी जाऊन ती समजून घ्यावी लागते. तिचे आर्थिक, सामाजिक, मानसशास्त्रीय पैलू समजावून घेऊन तिच्या सोडवण्याचा मार्ग नक्की आखता येतो. मी कचऱ्याच्या क्षेत्रात काम केल्यामुळे माझ्या लक्ष्यात आले कि प्रश्न नक्की सोडवता येणार आहे आणि लवकर सोडवता येणार असूनही आपण साठ वर्षे लावली याचे महत्वाचे कारण आपल्या सर्वांच्या डोक्यातील हि पक्की belief कि ‘आपण भारतीय बेशिस्त आहोत’, कचरा सार्वजनिक ठिकाणी गोळा करण्याच्या efficient systems नाहीत याचा विचार न करता चुकीच्या ठिकाणी भुई आपटत बसलो. कात्रज येथील ५०००० लोकसंख्येच्या प्रभागात योग्य system पुरवून, लोक system पाळतात हे दाखवून दिले. जेंव्हा कधी system मध्ये दोष येतात त्तेन्व्हाच कात्रज मध्ये परिस्थिती बिघडते. जे एका प्रभागात खर आहे तेच सर्व भारतीयांसाठी खर आहे.

लोक फार वाईट असल्याची आवई आपण मधून अधून उठवत राहतो, पण आपण हि या लोकांचाच हिस्सा आहोत न consider करता generalized विधाने करत राहतो. सर्वसामान्य माणूस म्हणून लोकशाहीत फक्त पाच वर्षांनी निवडणुकीत एकदा मत देणे एवढाच आपला रोल आहे  अशी आपली समजूत असते. खरतर यापेक्षा महत्वाची भूमिका आपण प्रत्यक्षात बजावत असतोहे आपल्या लक्ष्यातच येत नाही. समाजमनाचा धोरणे तयार करताना आणि राबवताना नेहमीच विचार केला जातो. लोकांना हे पचेल काजनक्षोभ तर होणार नाही ना याचा at the back of their mind विचार समाजधुरीण नेहमीच करत असतात. त्यामुळे समाज जितका विचार करायला आणि पारंपारिक पद्धतीच्या विचारांच्या चौकटीआणि त्या चौकटीना justify करणाऱ्या showstopper excuses चा trap समजेल तेवढा नेमक्या समस्या उकलीकडे जाण्याचा विचारांचा मार्ग मोकळा होईल.