आपला
स्वभाव, त्यानुसार लोकांनी आपल्यावर मारलेले
आणि आपण मनापासून स्वीकारलेले शिक्के आपण इतके सिरीयसली घेतो कि आपल्याला मिळालेले
एकुलते एक जीवन जगताना, त्या परीघाबाहेर जाणे ही तत्वांशी
तडजोड आहे असे आपल्याला वाटते. खरतर आपण तयार केलेल्या या कृत्रिम परीघाबाहेर अनेक
लोक सहज वावरत असतात. वयाबरोबर आपणमात्र या सीमारेषा गिरवून गिरवून आणिकच गडद करत
नेतो आणि स्वतःला स्वतःच तयार केलेल्या पिंज-यात सिमीत करत जातो अस मला वाटलं.
माझं वागणं सडेतोड असतं, मी फार हळवी आहे, मला कोणी challenge केलं की मी चवताळून उठतो, मला
माझं स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे. अशी आपापली आवर्तने गिरवत रहातो.
माणूस
आपल्या मेंदूची नगण्य क्षमता आपण वापरतो असे म्हटले जाते, त्याचे एक महत्वाचे कारण non-exploring the possibilities which
logically don’t suit my personality / identity आहे असे मला वाटते Once we identify with a way of living, sometimes it is a kind
of ism, we start belittling other ways of living. In this way, we console to
ourselves, that we are right and should continue in our own comfort zone.
अनुभव
हा गुरू असतो हे अगदी लहानपणापासून माहीत असूनही, आपण धक्क्यातून सावरत सावरत, स्वतःला
प्रश्न विचारत, एक आवर्तन पूर्ण करुन पुन्हा मूळ
ठिकाणीच विसाव्याला येणार असू तर life will simply repeat itself. जगात वावरताना आपल्याला अनुभवांचे धक्के बसतात.
आपली जीवनविषयक भूमिका साफ चुकीची ठरण्याचे प्रसंग येतात. पण ब-याचवेळा साधक बाधक
विचार करतोय अशा भ्रमात राहून फिरुन मूळ समजूतीपर्यंत येऊन पोहोचतो. याचं
कारण त्या समजूतीत दम असतो म्हणूनच फक्त नाही, तर
तिच्यावर आपलं मीपण अवलंबून असतं म्हणून.
वेगळं
वागल्याने काही आभाळ कोसळणार नसते. गंभीर लोकांनी बेफिकीर होऊन जगणं,
नी casual मंडळींनी sincerity दाखवणे शक्य आहे. पण आपल्या पद्धतीने जगण्याला आपण इतके justification चे लेप लावतो कि त्या लेपाचा पोपडा जड झाला, कडक झाला तरी त्याला स्वतःचा चेहरा असल्यासारखा
अत्यंत सहजपणे आयुष्यभर वागवतो.
वेडात
मराठे वीर दौडले सात प्रसंगातील शूरसेनापती प्रतापराव गुजर यांनी तत्वाच्या अति
आग्रहापायी जीव तर गमावलाच पण शिवाजी महाराजांनीही एक सच्चा साथी गमावला. Why do we always over emphasize our
virtues even when it is disproportional to the situation. जगानी मला चांगलं म्हणाव म्हणून ? का
तत्व सिद्ध करण्याची आपली जबाबदारी आहे अशी समजूत असते म्हणून ? काही भूमिका काही तत्वांना आपण चिकटून बसतो ती
आपली identity होतात. आणि मग आपला तुझे आहे तुजपाशी मधला आचार्य होऊन जातो, लोकांनी माझा उदोउदो केला आणि मीही त्यामुळे
त्या रस्त्यावर चालत गेलो असे म्हणणाऱ्या आचार्यांचे नाटकाच्या शेवटी येणारे
वक्तव्य आपल्याला अस्वस्थ करून जाते.
अरुणिमा
सिन्हा यांच्यावरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी हजर होते.
जगातले सात उंच पर्वत चढण्याचा मानस त्या
शूर मुलीनी या कार्यक्रमात व्यक्त केला. पण माझ्या मनात क्षणभर चर्र झालं. आपलं
जीवन कोणाला काय सिद्ध करून दाखवण्यासाठी व्यतीत करतोय का? अशी शंका आली. तिने आधीच इतक उच्च धाडस दाखवलय
कि आपण अचंबित होऊन जातो. त्या मुलीच्या आयुष्यात इतर नाजूक भावना अंकुरणारच नाहीत
का? तिने एक भीष्मप्रतिज्ञा केल्यामुळे मला
तिची व्यक्तीशः फार काळजी वाटली. मी चुकीचीही असेन कदाचित...
आयुष्यात
ध्येय हे फार महत्वाचे असते असे success literature बिम्बवते, आणि live the life as it comes असे अध्यात्मिक विचारात सुचवले जाते. स्वतःची
ठाम समजूत करून घेऊन एकाच प्रकारचे आयुष्य जगताना आपण अनेक इतर शक्यतांना नाकारत
असतो याचे भान असते का आपल्याला? आयुष्य
हे व्यामिश्र आहे आपण त्याला आहे तसं कवेत न घेता, तत्वांच्या परिघावरच चालत रहाणार का?