हे गाणं अनेक वेळा ऐकलं होतं खरं तर. पण आयुष्यात एक वेळ अशी आली की, सगळ ‘माझं’ म्हणून जपलेलं सोडून द्याव लागलं. त्यावेळी या ओळींच्या तळाशी पोहोचल्यासारखं वाटलं, त्यांचा अर्थ उमगला असं वाटलं.
आयुष्य आरामदायी व्हावं म्हणून आपण सगळी धडपड करत असतो. आखीव-रेखीव, आदर्श, सर्वांनी हेवा करावा असं आयुष्य आपल्याला जगायचं असत. यासाठी नोकरी, व्यवसाय, उत्पन्न, बचत, घर आणि कुटुंबासाठी सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी सगळी धावपळ आपण करत असतो. या धावपळीत एक balance साधत असतो, अगदी व्यवसायात धोका पत्करताना सुद्धा एक fall back mechanism तयार असते आपले. अगदी नातेसंबंधात सुद्धा आपला हा comfort टिकावा म्हणून अनेक compromise करत राहतो. प्रत्येक रोल मधे आपल्याला इतरांनी स्वीकारावे म्हणून अनेक तडजोडी करत राहतो.
आपण शहरच्या एखाद्या भागात राहण्यासाठी जास्त comfortable असतो. माहितीच्या किंवा आधीच्या व्यवसायाशी साधर्म्य असलेलाच व्यवसाय निवडण्याकडे आपला कल असतो. एका काठाला पकडूनच आयुष्य पुढे चालू असतं. या प्रवासात आपण काही भूमिका अंगीकारतो, आपली विचारांची एक पद्धत नकळत बनून जाते, तीच आपली style आणि identity बनून जाते. We are comfortable in our style, in our identity and we make a home with the help of all these bricks and mortars.

कही घर ना बनाना यारो, पाव जम जायेंगे, चलना भूल जाओगे ..
अपना किनारा नादिया कि धारा है|
ओ मांझी रे ...
Life is fluid, dynamic. If we are stuck at this self-created home, we miss the flow of life. The flow seems dangerous, as we have become used to the so-called safe life; which slowly becomes stale. We think whatever we have in life is assured to us. But one day we realize that the home was made of cards. At some point, life will sweep our feet anyways.
‘मी, माझं’ मधून आपल्या आयुष्याला बांध पडत जातात. जे जे मी माझं मानतो, त्याबद्दल कोणीही काही बोललेलं, टीका केलेली आपल्याला आवडत नाही. जितक्या जास्त गोष्टी ‘मी’ च्या कवेत घेतो तितका आपण त्रास वाढवतो. माझा देश, माझी विचारधारा, ism, माझ्या वस्तू, माझी मुलं, माझ्या भागाचा इतिहास यांच्या सहाय्यानी आपण आपला इमला बांधतो आणि मग तो सांभाळत बसतो. भला इसका इमला मेरे इमले से अच्छा कैसे या comparison च्या जाळ्यात अडकून, आयुष्य सटकून निसटून जात राहत.
आयुष्याला गृहीत धरलय का आपण ? आपल्या आयुष्यातले कित्येक लोक आज नाहीत. जे कायम असणारेत अशा वाटणाऱ्या किती गोष्टी आज आठवणीच्या अडगळीत गेल्या आहेत. कित्येक ठिकाणे जसे काही brands, शाळा, कॉलेज, ऑफिस, नोकरी जे असणारच अस वाटत होत ते इतके लांब गेलेत की आपला काही संबंधच राहिलेला नाही त्यांच्याशी. आपलंच पूर्वायुष्य, ही कोणीतरी सांगितलेली एक गोष्ट होती, असं वाटत राहावं इतकं परकं झालं आहे. जे काही आपण सत्य समजून चाललो होतो ते आता तितकं खरं राहीलेल नाही. कित्येक संकल्पना, मुल्ये मोडीत निघाली आहेत. किती महत्त्व दिले होते त्या छोट्या छोट्या गोष्टींना, ज्यांचा आज मागमूसही नाही. आज ज्या गोष्टींना महत्त्व देतोय, त्याही अशाच प्रवाही आहेत, त्या निसटून चालल्या आहेत. आपण त्यांना धरून ठेवायचा केविलवाणा प्रयत्न करतोय का?
ओ मांझी रे....
अपना किनारा नादिया कि धारा है|
या अर्थानी हे जग मिथ्या आहे, माया आहे, जो किनारा वाटतोय तो किनाराच नाहीये. त्यावर अवलंबणे सोड. आयुष्याच्या प्रवाहाबरोबर जायचंय, श्वास आहे तोपर्यंत पुढे जाणे आहे. म्हणून आता जे काही होतंय तेवढच बघ. या क्षणात जागून घे. उद्या श्वास असेल असं नाही. तुझे किती आप्तजन मृत्युच्या उंबरठ्यावर आतबाहेर करताहेत. आता जे करावस वाटतंय ते कर आणि प्रवाहाला अर्पण कर. त्यावर हक्क सांगून उपयोग नाही. तो मूर्खपणा ठरेल. हास्यास्पद आहे ते. तू काय करणार ? कारण तुझ खरंतर काहीच नाही. ज्या श्वासावर तू गमज्या मारतोस तो श्वासच तुला उधार मिळालेला आहे. त्या श्वासाची कदर कर, एक मोठ्ठ अवकाश दिसेल त्यात. श्वास मोजून मिळालेत, याची काळजी करायची गरज नाही, त्या काळजीत आणखी काही श्वास गमावून बसशील.
तुला मिळालेले अवकाश बघ, तू त्याचा भाग आहेस. ती फुलपाखर, ते पक्षी, ते नितळ आकाश, निबिड अरण्य, भयंकर वादळ, अशा चराचराचा तू एक भाग आहेस. विहार कर, आनंद साजरा कर, त्याला साचवून ठेवायचा प्रयत्न करू नकोस. पुढे आणखी आनंद आहे, दु:खही आहे. आत्तापर्यंत प्रसंग आले आणि निभावले तसे अजूनही येणार आहेत. तू का चिंता करतोयस. जीवनाचं प्रवाहीपण समजून घेणं आणि let go करत पुढच्या क्षणाला सामोर जाणं गरजेचं आहे. कवेत घे येणाऱ्या क्षणाला.
Shekhar Kapoor says, "It’s time to throw caution to the winds. It’s time .. let yourself be blown away by the storm. Time to experience what else life has to offer."
अपना किनारा नादिया कि धारा है|
ओ मांझी रे ...