Friday, April 23, 2021

स्थैर्यातील खळबळ

 7 habits of highly effective people या पुस्तकाच्या अनुषंगाने मी सेशन घेत असते. हे पुस्तक स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अनेक अवघड प्रश्नांना आपल्याला सामोरे करवते. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही हि म्हण इतकी बरोबर आहे कि या पुस्तकात नमूद केलेल्या प्रक्रियेतून जाताना व त्याबद्दल लोकांशी बोलताना कायम एक प्रश्न पुढे यायचा; कि या सगळ्याची, म्हणजे स्वतःवर इतके काम करण्याची काय आवश्यकता आहे. आम्ही आहोत ते छान आहोत, आयुष्यात गोष्टी achieve केलेल्या आहेत. उगीचः स्वतःचे दोष धुंडाळून दु:खी होण्यात काय अर्थ आहे. या विधानच समाधानकारक उत्तर मी देऊ शकायची नाही.

आज अचानक मी माझ्या belief तपासण्यासाठी एक प्रश्नावली सोडवत असताना अस लक्षात आल कि; माझ्या काही आत रुतून बसलेल्या धरणांमुळे, मी माझ्या आयुष्यात एका टप्प्यावर थांबले आहे. त्या प्रश्नावलीने माझ्या मनाचा तळ ढवळून काढला आणि मला unsettle केलं. पुढची पायरी चढण्यासाठी I am not enough आणि त्यासाठी नेमकं काय करायला हवाय तेही मला ती प्रश्नावली सोडवताना कळत गेलं. मला छान वाटल, डोळे पाण्याने भरले. पुढच्या वाटचालीसाठीची चाल मिळाली. आणि माझ्या एकदम अस लक्ष्यात आल कि माझी सध्याची अस्वस्थता या थांबलेपणामुळे आली होती. माझी तगमग होत होती पण त्याचे कारण आपल्या आतच दडले आहे हे कळत नव्हते.

आपली growth हि spiral स्वरुपाची असते. पण तरीही प्रत्येक टप्प्यावर स्वतःला परिपूर्ण समजून आपण थांबतो. त्यामुळे एक प्रकारची complacency येते.  तश्या तऱ्हेच्या ego boosting ची गरजहि असते मधून अधून, पण तो शेवट नाही हे आपल्याला कोणीतरी सांगितलं पाहिजे. किंवा मधून अधून आपण स्वतःला unsettle करण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. डिवचून डिवचून रवंथ करत बसलेल्या स्वतःला उठवून चालते केले पाहिजे.

माणसाची उत्क्रांती हि मेंदूची उत्क्रांती आहे. मेंदू आपल्याला विकासासाठी सतत उद्युक्त करत राहतो. पण समाजानी लहानपणापासून सांगितलेल्या आणि बिंबवलेल्या काही स्टोरीज मुळे, पैसे मिळाले, प्रसिद्धी /नाव मिळाल, पोर मार्गी लागली कि आपण स्वतःला कृतकृत्य समजतो. आपली चालू असलेली नेहमीची (मेंदूची) कामे थांबवतो आणि आयुष्य उपभोगण्यासाठी स्वतःला मोकळ करतो. पण या मोकळ्या काळात माणूस सुखी होतो का? का एकटा होतो? का अस्वस्थ होतो? समाजानी दिलेल्या सुखाच्या व्याख्या खरच त्याला सुखी करतात का? असा विचार मला सतावू लागला.

कोणत्याही पद्धतीने थांबण्यात एक प्रकारची stagnancy असते. तुम्ही तुमची बुद्धी न वापरल्यास ती नकारात्मक विचार, आयुष्याबद्दलची निरर्थकता यात स्वताचे विचार convert करू शकते. Veronika decides to die या Paulho Cohelo ने लिहिलेल्या पुस्तकात वेरोनिका २४ वर्षाची असते आणि तिला आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम नसतो पण आता जगून झाल यापुढे आणखी आयुष्यात काय असणार आहे असे तिला वाटते. आत्तापर्यंत जगलेल्याचीच पुनरावृत्ती होणार असेल; तर आयुष्यात काही  राम नाही असे समजून ती आत्महत्या करते. सधन देशांमध्ये survival च कोणतेही challenge नसणे हा एक फिलोसॉफीकल प्रश्न आहे. Artificial intelligence च्या सानिध्यातील आपल्या नजीकच्या भविष्यकाळात मानवी जीवनाची निरर्थकता हा वैश्विक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता युवान हरारी व इतर भविष्यवेत्ते मांडत आहेत. त्याची चुणूक करोना काळातहि आपण पहिली आहे.

आपणही समाजाने दिलेल्या स्टोरीच्या फशी पडून अशी आत्महत्याच करतो का? शारीरिक नाही तर हि बुद्धीची आत्महत्या आहे ही. मेंदूला रोज नवनवीन खाद्य लागते, ते एका पातळीवर, त्या पातळीवर त्याची जी भूक असते तेवढ खाद्य मिळेनास झाल कि मेंदू शरीरात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करतो का? ज्याला आपण existential crisis, midlife blues, एकाकीपणा, निरर्थकता अशी नवे दिली आहेत का? आपण आपला मेंदू ज्या प्रकारची निर्मिती करण्यात किंवा समस्या सोडवण्यात आनंद मिळवतो ते करत राहिलो आणि त्यामध्ये स्वतः वर काम करत स्वतःच्या व्यक्तिमत्वातील barrier ओलांडत गेलो तर; आपण आपल्यासाठी तयार केलेल्या मानसिक समस्या स्वतःचे परीक्षण करत सोडवू शकू का? याचसाठी life long learning ची आवश्यकता आहे अस म्हटलं जात कि काय हा मुद्दा मला सतावतोय? हे learning विषय शिकण्यासाठी गरजेचे नसून स्वतःला उन्नत करत नेणे आहे असे मला वाटते.

पूर्वीच्या निवृत्ती च्या कल्पनेत आणि सध्याच्या निवृत्तीच्या कल्पनेत फारच फरक पडला आहे. पूर्वी निवृत्तीनंतर स्वतःच्या  शोधात व अध्यात्मिक उन्नतीसाठी माणूस बाहेर पडायचा. या उन्नतीसाठी तो स्वतःच्या मेंदूचा विकास साधत असे. सर्वसंग परित्याग करण्यासाठी व्यक्तीला खूप गोष्टी unlearn कराव्या लागतात. त्यामध्ये त्याचा मेंदू व्यस्त असायचा, आणि ती एक प्रकारची growth आहे. मानवी विकास हा मेंदूचा विकास आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर हा विकास थांबला तर व्यक्ती dysfunctional होते असे कि काय असे मला वाटू लागले आहे. हा अतिशय अर्धवट विचार असेलही पण तो आता माझ्या मनात मूळ धरू लागला आहे.   

माझा ब्लॉग अशाच अर्धवट विचारांनी भरलेला असणार याची मला कल्पना होती बहुतेक म्हणून त्याच नावही Half embrace आहे