Sunday, June 1, 2025

सहजता

आपल्याला आपली story बनवण्याची free will आहे. ही स्टोरी आपण बनवतच असतो. 

आपण जगाकडे आपल्या धारणांच्या भिंगातून पाहतो. एकीकडे धारणा आणि दुसरीकडे ego या दोन्ही च्या मधे खरतर सहजता वाहत असते. पण त्यात शिरण्यासाठी हे दोन्ही किनारे सोडावे लागतात. आपण लटकत राहतो मधेच, जस्टिफिकेशन आणि excuses च्या कोलांट्या उड्या मारत.

धारणांची बादली.. त्यात चांगल्या वाईटचे रंग..

आपला ego हे रंग पकडतो. आवड नावड ठरते.

तेच सत्य आहे असं समजतो. त्याच्यासाठी आयुष्य पणाला लावतो

Ego च्या कचाट्यातून सुटायच. ट्रिगर, भावना पहायला शिकायचं, मनाचे खेळ पहायचे आणि धारणा सिरीयसली घ्यायच्या नाहीत, कोणी काहीही बोलतात ते मनाच्या नख्या घट्ट पकडतात हे लक्षात घ्यायचे.

आपल्या मनाच्या या सगळ्या कारभाराकडे पाहत रहायचे. मंद हसायाचे आणि सहज मजेत रहायचे.