Emotional Detour
We at times take a long emotional detour
in life. – चकवा लागल्यासारखी. म्हणजे जे अंतर अगदी कमी असते आणि सहज कापता येण्यासारखे असते, ते कापण्यासाठी
आपण आयुष्याची अनेक वर्षे वाया घालवतो. एखादे
सुर्हुदाबरोबर झालेलं भांडण आठवा, नात्यात झालेले गैरसमज असोत, हिंदी सिनेमात
दाखवतात तशी खानदानी दुष्मनी असो - आपण रागावतो, भांडतो, अन्यायाच्या विरुद्ध उभे
राहतो, आपण काटेरी होतो, आपल्याला टोकं येतात, भाषा बोचरी होते. मग आपण justification, आग्रह,
दुराग्रह, दुरावा,
एकटेपणा, depression, therapy, let go, forgivance अश्या चक्रातून जातो. ससेहोलपट, जगण्याचे चटके यांनी घायाळ होऊन आपली कणिक पार तिम्बली
जाते. आणि मग आपण realization च्या थांब्यापाशी येतो. हे
ठिकाण खरं तर प्रवास जिथून सुरु झाला त्या ठिकाणापेक्षा अजिबात वेगळे नसते. पण ‘ती
जागा’ आता अधिक प्रगल्भ असते. लौटके बुद्धू घर आये म्हणतात ना तसच काहीतरी.
Pain takes us to destination
‘realization’. Some of us mature early because life showed us the worst side of
the world at an early age. Sometimes, we need to be hurt in order to grow. We must lose in order to
gain. Sometimes, some lessons are learned best through pain.
As Sadguru said, “Self-realization
means to realize how foolish you have been. Everything has been right here
within you and you did not get it.” No matter how long you have traveled in the wrong direction, you can
always turn around. Sometimes it takes few years to get to that one moment
that will change your perception and thereby your life.
खरंतर दु:ख
suffering ही एक काल्पनिक गोष्ट आहे.it is different from pain... माणूस स्वत:भोवती
दुःखाच एक काल्पनिक कुंपण बनवून घेतो. त्यातून तो स्वतःची आणि जगाची सहानभूती
मिळवतो... आयुष्यातील प्रत्येक बदलाला एक धक्का लागतोच लागतो...जोवर एखादी बोच
खोलवर रुतून टोचत नाही. श्वास घेणे अशक्य होत नाही, तोवर माणूस
हातपाय मारण्याच्या भानगडीत पडत नाही. आयुष्याच्या एका क्षणी हट्ट सोडावा आणि
उरलेले आयुष्य सुखासाठी जगावं हे जाणवते आणि मग माणसं बदलतात...! स्वतःच्या समजुती, दृष्टीकोन बदलणे हा एक मोठा प्रवास आहे.
The greater part of human pain is
unnecessary. It is self-created as long as the unobserved mind runs your life. अस Eckhart Tolle म्हणतो. बोलायला, सल्ला द्यायला सोप वाटल तरी त्याप्रसंगातून जाताना –
विचार, भावना,
कृती च कडबोळ नामोहरम करत, आपल्याला खूप वेळ झुलवत ठेवतात. आपणहि त्या चकव्यात
अडकतो. आपल्याच समजुतींचा चकवा! समजुतीत अडकलेले विचार फिरून फिरून मीच कसा बरोबर,
मीच कसा असहाय्य, इतर कसे चूक याची ग्वाही देत, मीच कसा कमनशिबी अश्या स्वरचित
गोष्टींच्या झुल्यावर बसून भोवळ आणतात पण पाठ काही सोडत नाहीत आणि या
चक्रव्यूहातून मार्ग काही सापडत नाही. Spiritual healing is not just
becoming free from pain, it is realizing that you were never really trapped. ~
James Keeley
याचं महत्वाच कारण
म्हणजे आपण आपल्या आयुष्याची एक गोष्ट तयार केलेली असते. गोष्ट लिहिण्यात एक
महत्वाचा भाग characterization चा असतो. जसं गोष्टीत एखाद character
establish होण्यासाठी त्याच्या behavior चा आणि
विचारांचा एक pattern तयार करावा लागतो.
म्हणजे तो त्या कथेत villain किंवा हितचिंतक म्हणून establish
होतो. त्यामुळे कथा probable होते आणि
समोर बसलेल्या logical प्रेक्षकाला/ वाचकाला रुचते. आपल्या आयुष्याची जी गोष्ट असते त्याचे
मध्यवर्ती पात्र आपण स्वतः असतो. ज्याच्यात आपण भारी किंवा बिच्चारे किंवा unloved किंवा त्यागमूर्ती किंवा असे काहीतरी असतो. आपल्या
या गोष्टीत facts ची वीण असते. पण गोष्टीतले रंग हे पूर्णपणे आपण भरलेले
असतात. त्याला भावना चिकटलेल्या असतात. त्यामुळे ती गोष्ट दुसरे कोणी भेदू शकत नाही. आपल्यालाच
ती भावनांची वीण, सोडवावी लागते. हि गुंतागुंत आपला खूप वेळ घेते. अगदी logically सोप्या
वाटणाऱ्या गोष्टी psychologically entangled असतात.
आपल्या आयुष्याची गोष्ट दुसरी
व्यक्ती अगदी वेगळ्या पद्धतीने सांगेल. जरी आपल्या आयुष्यातल्या सर्व घटनांना ती
व्यक्ती साक्ष असेल तरीही. त्याच घटनांचा अर्थ ती व्यक्ती वेगळा लावेल. आपल्याला
अवघड वाटणारे आपल्या आयुष्यातील प्रश्न त्या व्यक्तीला सहजसाध्य वाटतील कदाचित.
म्हणून आपल्या
आयुष्याच्या आपल्या मनातल्या गोष्टीच ‘destorification’ केलं तर काही गुंते सहज सुटू शकतील, कारण एक काल्पनिक
स्टोरी चा संदर्भ सुटला कि गोष्टी सुट्या-सुट्या होतील. एखाद्या आर्ट फिल्म
सारख्या. सत्याच्या जवळ जाणाऱ्या, वेगवेगळी interpretation
शक्य असलेल्या facts. स्टोरीचा कृत्रिम धागा
आपल्याला आत्ता घडलेल्या घटनेचा भूतकाळातल्या एखाद्या गोष्टीशी आपल्याला वाटतो
तसाच परस्पर संबद्ध आहे असा आभास निर्माण करतो. म्हणून Ekhart
Tolle म्हणतो तसे “When you are present in this moment, you break the continuity of your story,
of past and future, then true intelligence arises, and also love”
अगदी खर आहे राख येणं स्वाभाविक असते पण तो सोडून देणे आणि पुढे जाणे हे महत्त्वाचे हे ज्याला जमते तोच सूखासमाधानात जगतो हीच आनंदी आयुष्रयाची गुरूकिल्ली
ReplyDeleteYou have put a complex concept in a simple language. New word -'Destorification' reminds me of Vipassanna or meditation that can help us get free of desires.
ReplyDeleteIntellectually it is a concept so easy to understand, i have understood it a million times now. But to realise it,may be only meditation will help.
ReplyDeleteKishori मुक्त expression आहे!!!
ReplyDeleteI felt you are describing ‘wisdom’ . It contains maturity, forgiveness, let go approach, objectivity and positivity. Wisdom grows with the age. Of course in case of few people only age grows.
comment by my friend Leena Tak on watsapp
comment by my friend Nandini Vartikar on watsapp
ReplyDeleteआणि प्रिज्युडाईस विचारांच्या ओझ्याखाली मूळ साधा असलेला प्रसंग गाडून त्यावरच्या विचारांचं अवडंबर माजवतो
किशोर खरंच वास्तव चित्र!
ReplyDeleteअशा गोष्टी आपण अगदी आपल्या आसपास बघत असतो तुझं निरीक्षण अगदी अचूक आहे!
कितीतरी वेळा असं दिसतं की जवळच्या माणसाकडून अनवधानाने घडलेली चूक त्या वेळी जिव्हारी लागते पण तसं त्या व्यक्तीच्या निदर्शनास आणून दिलं तर लगेच सावरता येतं पण त्याऐवजी माणसं ते मनात धरून कुढत राहतात त्या प्रसंगाविषयीची नाराजी त्या व्यक्तीविषयीच्या नाराजीत बदलते आणि त्या व्यक्तीवरच संपूर्ण फुली मारली जाते
मनाचे दरवाजे असे बंद केले जातात आणि परतीचे दोर स्वतःच्याच हातांनी कापले जातात!!
तू अगदी यथार्थ लिहिलं आहेस!!
👍🏻👌🏻
comment by my friend Smita Rajahans- Shaligram
किशोरी सहज सुलभ उपाय छान मांडला आहेस. स्वनिर्मित दुःखामुळेच माणसं गाठी निर्माण करुन गुंता वाढवुन ठेवतात. ती स्वत:च एकेक गाठ सोडवायला हवी, म्हणजे गुंता सुटेल. समोरुन विचार न करता स्वत:च्याच द्रृष्टिकोन व मताला कुरवाळत बसतात.
ReplyDeletecomment by my friend Ratna Sangamnerkar on watsapp